देश विदेश

Nagaland मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला ? 

Nagaland Assembly Election Result..

Spread the love

राजकीय : Nagaland मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला? How did Sharad Pawar’s NCP do a miracle in Nagaland?

आवाज न्यूज : विशेष प्रतिनिधी, ३ मार्च.

नागालँड विधानसभेत जी गोष्ट काँग्रेसला शक्य झाली नाही, ती गोष्ट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कशी शक्य झाली?

गुरुवारी जाहीर झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे.

नागालॅंड (Nagaland) विधानसभेत राष्ट्रवादीला (NCP) ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत.  (Nagaland Assembly Election Result : how did Sharad Pawar’s NCP make it possible)

राष्ट्रवादीच्या या यशाची कालपासून जोरदार चर्चा चालू आहे. नागालँडमध्ये १२ जागांसह भाजप इथे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे ७ जागा मिळाल्या आहेत. भाजप सत्तेत सहभागी असल्याने राष्ट्रवादी हा विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे आता पवारांचा पक्ष आता नागालँड विधानसभा सभागृहात विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!