अध्यात्मिकमावळ

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचे दर्जेदार काम करा.विभागीय आयुक्त सौरभ राव.

Spread the love

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचे दर्जेदार काम करा..विभागीय आयुक्त सौरभ राव.Do quality work of Srikshetra Bhandara dongar..Divisional Commissioner Saurabh Rao.

आवाज न्यूज मावळ प्रतिनिधी, १९ ऑगष्ट.

भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी दर्जेदार व प्रभावीपणे कामे करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत, अशी माहिती माजी मंत्री संजय भेगडे यांनी दिली.

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर विकास आराखडासंदर्भात पुणे येथील विधानभवनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी माजी मंत्री भेगडे, आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, विश्वस्त साहेबराव काशीद, गजानन शेलार, दिलीप ढोरे, मंदिर आर्किटेक्ट सोमपुरा आदी
होते. याप्रसंगी भंडारा डोंगर विकसनाबाबत चर्चा करून विकास कामांसंदर्भात नियोजन करण्यात आले. मूलभूत सुविधा उपलब्ध करा.

विभागीय आयुक्त राव यांनी या वेळी भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावे, तीर्थक्षेत्राचा विकास करताना भाविकांना व स्थानिक नागरिकांना दर्जेदार व पायाभूत सुविधा मिळाव्यात याची खात्री करावी, मावळ तालुका व खेड तालुका कृषी व महसूल विभागाच्या ताब्यात असलेली गायरान जागेसंदर्भात बैठक घ्यावी, परिक्रमा मार्गावर असणाऱ्या वनविभागाच्या जागे संदर्भात प्रस्ताव सादर करावा, मुख्य मंदिर, रस्ते, पाणीपुरवठा या पायाभूत सुविधांची पहिल्या टप्प्यात कामे सुरू करावी आदी निर्देश दिले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!