Puneसामाजिक

लोणावळा पुणे अनेक लोकलगाड्या रद्द..

प्रगती, इंद्रायणी, कोयना, डेक्कन एक्सप्रेस गाड्या रद्द.

Spread the love

लोणावळा पुणे अनेक लोकलगाड्या रद्द ; प्रगती, इंद्रायणी, कोयना, डेक्कन एक्सप्रेस गाड्या रद्द.Lonavala Pune many local trains cancelled; Pragati, Indrayani, Koyna, Deccan Express trains cancelled.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १९ ऑगष्ट.

लोणावळा पुणे अनेक लोकलगाड्या ता.२० रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रगती , डेक्कन , इंद्रायणी या आप आणि डाऊन गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून देहूरोड ते चिंचवड दरम्यान सिग्नल यंञणा दुरूस्तीची कामे करण्यासाठी हा एक दिवसाचा मेगाब्लाॕक घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

गाडी क्र पुणे ते छ.शि.म.टर्मिनल ला जाणाऱ्या 12127 प्रगती ,10008 डेक्कन एक्सप्रेस ,11030 कोयना एक्सप्रेस , 12128 इंद्रायणी एक्सप्रेस तसेच छ.शि.म.टर्मिनल ते पुणे 12125 प्रगती एक्सप्रेस , 11007 डेक्कन एक्सप्रेस , 11029 कोयना एक्सप्रेस , 12127 इंद्रायणी एक्सप्रेस या रद्द केल्या असून इंदोर एक्सेस 18.00 वाजता व पुणे ते जयपूर या 17.45 वा सोडण्यात येणार आहे.

लोणावळा ते पुणे डाऊन लोकल पहाटे 6.30 ,7.25, 8.20, 10.05, 14.50, 15.30 ,19.00 या रद्द केल्या आहेत.
पुणे ते लोणावळा अप लोकल सकाळी 7.50, 9.25,11.15,12.37,16.20,17.50,18.36, या लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच मेल एक्सप्रेस गाडी क्रमांक 122159, 17222,22732 आणि 16332 या विलंबाने धावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!