निधनवार्तामावळ

पञकार गोपीनाथ मानकर यांचे आकस्मित निधन..

Spread the love

पञकार गोपीनाथ मानकर यांचे आकस्मित निधन.Sudden death of Pankar Gopinath Mankar.

आवाज न्यूज  : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा, प्रतिनिधी १३ सप्टेंबर.

लोणावळ्यातील जेष्ट पञकार व सिटी सर्वे कार्यालय , तलाठी व मंडलअधिकारी कार्यालयाचे मदतनीस गोपी तथा गोपीनाथ रामचंद्र मानकर (वय-अंदाजे ६० ) यांचे मंगळवारी ता.१२ पहाटे सहाचे पूर्वी मंडलअधिकारी कार्यालय व सिटीसर्वे कार्यालयाजवळ निधन झाले.

सकाळी दहा वाजता लोणावळा शहर पोलिसांना फोनवर माहिती मिळाल्यावरून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.कै.गोपीनाथ मानकर यांचे पार्थिव तळेगाव येथे उत्तरीय तपासणीनंतर लोणावळा शहरचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पी.एन.भिसे यांनी पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. ता.१२ पहाटेच्या सुमारास तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचा पी.एम अहवालात डाॕक्टरांनी नमूद केले आहे.त्यांचे पश्चात दोन भावजयी , पुतने , पुतन्या राजेश सुधाकर मानकर असा परिवार आहे.

कै.मानकर यांचे पार्थिवावर लोणावळ्याचे कैलासनगर स्मशानभूमित अत्यंत जवळचे नातेवाईकांच्या व पञकारांचे उपस्थितीत ता.१२ रोजी दुपारी दोन वाजता आंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर , शहर पञकार संघाचे माजी अध्यक्ष अॕड.निखिल कविश्वर , माजी नगरसेवक व पञकार विशाल विकारी , पञकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी , तसेच सामाजिक कार्यकर्ते व कराटे मास्टर उमेश तळेगावकर नगरपालिकेचे मुकादम , कर्मचारी, तसेच संत रोहिदासवाडा येथील नागरिक , महिला आदी उपस्थित होते. विकारी यांनी व कविश्वर यांनी यावेळी श्रध्दांजली वाहिली.

 

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष व दिपक मांडप डेकोरेटर्सचे मालक कै.शाहरूख तथा दिपक रामचंद्र मानकर व श्री संत रोहिदास तरूण मंडळाचे माजी अध्यक्ष कै.सुधाकर रामचंद्र मानकर यांचे ते लहान बंधू होते.
कै.गोपीनाथ मानकर यांनी सा.लोणावळा टाईम्समधून संपादक वा.मो.बांदेकर व चंद्रकांत जोशी यांचे मार्गदर्शनाखाली वार्ताहर व पञकारितेला सुरूवात केली होती. पुढे ते मावळचा समृद्ध समाचार , खोपोलीचा सा.आजचा महाराष्ट्र , सा.अंबर , तसेच कर्जतचा सा.अक्षरतेज तसेच त्यांनी संपादक म्हणून उंबरठा हे थोडेफार दिवस चाललेले साप्ताहीक काढले होते.
साधी राहणी , मनमिळावू स्वभाव , निस्वार्थी स्वभाव यामुळे तो पुणे , मुंबई येथून आलेल्या सर्वच प्रिंट व वृतवाहिनीचे पञकारांचे मन जिंकत असे. शहरातील खडाडनखडा माहिती ते पुरवीत असे.

सुरवातीला डाॕ.बाबासाहेब आंबेडकर रिक्षास्टँडचा रिक्षाचालक म्हणूनही ते काम करीत होते. सिटीसर्वेचे सर्वच माजी.अधिकारी व मंडलअधिकारी यांचा मदतनीस म्हणून तो प्रसिध्द होते.श्री संत रोहिदास तरूण मंडळाचे माजी आध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. उपमुख्यमंञी अजितदादा पवार , माजी खासदार अशोकराव मोहोळ यांचेशी मानकर परिवाराचे जवळचे संबंध होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!