क्रीडा व मनोरंजनमावळ

कलापिनी बालभवनची पारंपारिक दहीहंडी व पुस्तक हंडी उत्साहात..

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कलापिनी बालभवनची दहीहंडी बालचमूंनी रिमझिम पावसांच्या सरीत उत्साहात साजरी केली..

Spread the love

कलापिनी बालभवनची पारंपारिक दहीहंडी व पुस्तक हंडी उत्साहात..प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कलापिनी बालभवनची दहीहंडी बालचमूंनी रिमझिम पावसांच्या सरीत उत्साहात साजरी केली

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १३ सप्टेंबर.

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कलापिनी बालभवनची दहीहंडी बालचमूंनी रिमझिम पावसांच्या सरीत उत्साहात साजरी केली
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मुले राधा कृष्णाच्या वेशभूषेत सजून आली होती. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन करून श्लोकाने झाली. मीरा कुन्नूर यांनी मुलांना दहीहंडीची माहिती व सुदाम्याची मूठभर पोह्यांची गोष्ट सांगितली.

 

पालकही मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. पालकांनी आज गोकुळात रंग व किती सांगू मी सांगू कुणाला या गीतावर फेर धरून कार्यक्रमात रंगत आणली. बाल भवनच्या सर्व बालचमुंनी ही उत्साहात दहीहंडी भोवती फेर धरला व दहीहंडी फोडली.त्याचवेळी पुस्तक हंडीचेही आयोजन करण्यात आले होते. कादंबरी देशपांडे या पालकांनी कृष्णाच्या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. शेवटी मुलांना दही काल्याचा प्रसाद देण्यात आला. पारंपारिक पद्धतीने साजरी केलेली दहीहंडी बघून पालकही आनंदीत झाले.

नटराजाच्या श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालभवन प्रमुख मधुवंती रानडे मीरा कुन्नूर आणि ज्योती ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा शिंदे माधवी एरंडे आणि विशाखा देशमुख यांनी नियोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!