औद्योगिकक्रीडा व मनोरंजनमावळ

बाळासाहेब काकडे यांना उद्योगरत्न पुरस्कार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान.

Spread the love

बाळासाहेब काकडे यांना उद्योगरत्न पुरस्कार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान.Udyog Ratna Award to Balasaheb Kakde by MP Srirang Barane.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ३१ ऑक्टोबर.

प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून यशस्वी उद्योजक अशी ओळख मिळवलेले बाळासाहेब महादेव काकडे यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदोरी येथील चंपाबाई पवार व ज्ञानोबा पवार यांच्या १९ व्या पुण्यस्मरणानिमित्त व मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांच्या अकराव्या मासिक श्रद्धांजलीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. काकडे यांनी नगरपरिषदेचे नगरसेवक व विरोधीपक्षनेते पदाची यशस्वी कारकीर्द गाजवली, शेती, वीटभट्टी, वाळू व्यवसाय,खडी क्रशर,पोल्ट्री, पेट्रोल पंप, बांधकाम व्यवसाय अशा विविध व्यवसायांमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप मोहिते पाटील,माजी आमदार विलास लांडे, माजी मंत्री बाळा भेगडे,उद्योजक विजय जगताप, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, संचालक शिवाजीराव पवार, उद्योजक रामदास काकडे, भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, कोल्हापूरचे सभापती प्रदीप झांबरे, पांडुरंग खेसे, विठ्ठलराव शिंदे, प्रशांत ढोरे, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कुऱ्हेकर व इतर महात्म्यांचे संत पूजन करण्यात आले. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात उद्योगरत्न पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब काकडे यांना,आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार राहता येथील प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान डांगे यांना, कृषिरत्न पुरस्कार शेलारवाडी येथील शंकरमामा शेलार यांना,समाजरत्न पुरस्कार पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक जयंत बागल यांना, तर नारी गौरवरत्न पुरस्कार चिंचोशीच्या सरपंच उज्ज्वलाताई गोकुळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.उद्योजक बाळासाहेब महादेव काकडे यांना मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे हस्ते उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना काकडे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी राधिकाताई काकडे, त्यांचे बंधू प्रसिद्ध उद्योजक, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,चिरंजीव माजी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे,उद्योजक युवराज काकडे,विक्रम काकडेसह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

बाळासाहेब महादेव काकडे, वय 67 वर्ष.महादेव काकडे व यशोदा काकडे यांचे चौथे अपत्य. त्यांनी इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी घेतली.शेतात आई वडील यांचे बरोबर काम करत महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. कुस्तीची आवड, डोळसनाथ तालीम येथे व्यायाम करून शरीरयष्टी कमवली,महाविद्यालयातर्फे तसेच इतर कुस्ती स्पर्धामध्ये पारितोषिके मिळवली. नोकरी न करता व्यवसायाची आवड असल्याने वीटभट्टी सुरू केली. आणि त्या व्यवसायात तालुक्यात जम बसविला. वाळू व्यवसाय कोणाला माहित नसताना,सरकारी लिलाव घेऊन इंद्रायणी नदीची वाळू विकण्याचा व्यवसाय सुरू केला.1988 साली बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. तालुक्यात पहिली जेसीबी मशीन घेतली. कुठलाही व्यवसाय स्वतः पुरता मर्यादित न ठेवता सर्वांना त्याची माहिती देत व्यवसायास उद्युक्त केले. भाऊ, पुतणे,भाचे,मित्र,या सर्वांना नोकरी ऐवजी व्यवसायास प्रवृत्त केले.1991 साली शहर विकास समिती तर्फे नगरसेवक म्हणून विजयी. स्टेशन भागात सर्वाधिक विकास कामे केली. पुन्हा 2006 साली नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते झाले.उद्योग, सामाजिक व राजकारण क्षेत्रातील सर्वपक्षीय चांगले संबंध प्रस्थापित केलेले अजातशत्रू म्हणून काकडे यांची विशेष ओळख आहे. त्यामुळे बंधू रामदास काकडे, पुतण्या गणेश काकडे,बहिण सुलोचना आवारे आणि तारामती करंडे, मुलगा संग्राम यांना राजकीय पदार्पणातच यश प्राप्त झाले.

नवनवीन व्यवसायाची आवड असल्यामुळे आज खडी क्रशर व्यवसाय,शेती, पोल्ट्री, पेट्रोल पंप, बांधकाम व्यवसाय सुरु केले आहेत.पत्नी राधिकाताई काकडे, मुले- संग्राम, युवराज,विक्रम आपआपल्या उद्योगात यशस्वी क्रियाशील आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर ढमाले व गुलाब वाघोले यांनी, तर मावळ भाजपचे माजी अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!