नगरपरिषदसामाजिक

महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना तळेगाव दाभाडे नगर परिषद शाखेच्या अध्यक्षपदी मुरलीधर उर्फ अनिल टकले यांची बिनविरोध निवड.

Spread the love

महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना तळेगाव दाभाडे नगर परिषद शाखेच्या अध्यक्षपदी. अनिल टकले यांची बिनविरोध निवड.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ नोव्हेंबर.

महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना तळेगाव दाभाडे नगर परिषद शाखेच्या अध्यक्षपदी मुरलीधर उर्फ अनिल टकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संघटनेचे अध्यक्ष रविंद्र काळोखे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्तपदी निवड करणेकरीता १७ नोव्हेंबर रोजी बोलविण्यात आलेल्या विशेष बैठकीमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी पुणे विभाग सदस्य प्रविण माने, उपाध्यक्ष पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे, संघटक प्रशांत गायकवाड सल्लागार भास्कर वाघमारे, हिरामण लांडे, अनिल इंगळे, सचिव रोहित भोसले, सहसचिव प्रवीण यादव, अंकुश जाधव, अश्विनी गरुड खजिनदार विलास वाघमारे, प्रकाश मकवाना आणि कर्मचारी वर्ग बैठकीस उपस्थित होते.

आपल्या कारकिर्दीमध्ये कामगारांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्याकरीता १०० टक्के योगदान देण्याचा मनोदय नवनिर्वाचित अध्यक्ष मुरलीधर टकले यांनी व्यक्त केला.
तसेच यावेळी उपाध्यक्षपदी भास्कर वाघमारे, ज्योती वाघेला आणि बाळासाहेब शेलार यांची सल्लगारपदी नवनियुक्ती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!