निधनवार्ता

शेटेवाडी येथील प्रगतीशील शेतकरी पंढरीनाथ शेटे यांचे अल्पशः आजाराने निधन.

Spread the love

शेटेवाडी येथील प्रगतीशील शेतकरी पंढरीनाथ शेटे यांचे अल्पशः आजाराने निधन.

आवाज न्यूज  : मच्छिंद्र मांडेकर. तळेगाव स्टेशन प्रतिनिधी,२५ डिसेंबर.

शेटेवाडी येथील प्रगतीशील शेतकरी पंढरीनाथ (बुवा)बळवंत शेटे (वय-६५) यांचे आल्पशः आजाराने ता.२३ रोजी निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी , एक विवाहीत व एक आविहीत मुलगा, एक विवाहीत कन्या, दोन विवाहीत बहिणी, सून, नातवंडे, असा परिवार आहे.
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार शिवराम भसे यांचे ते मेहुणे होत.
सामाजिक कार्यकर्ते शंकर शेटे यांचे ते भाऊ आणि युवक कार्यकर्ते विशाल शेटे व विराट शेटे यांचे ते वडील होत.
गेली पंधरा वीस वर्षापासून ते तळेगाव स्टेशन परिसरात राहात होते. त्यांचे पार्थिवावर ता.२३ रोजी बनेश्वर स्मशानभूमि , तळेगाव दाभाडे येथे शोकाकूल वातावरणात अँत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे सचिव रामदास पडवळ , आखिल भारतीय वारकरी मंडळचे जिल्हा पदाधिकारी सुखदेव महाराज ठाकर , माजी पंचायृत समिती उपसभापती शांताराम कदम , शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर यांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर संत तुकाराम महाराज पादुस्थानसेवा स्थानचे अध्यक्ष भरतशेठ येवले , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार भसे , मावळभूषण , भजनसम्राट झीटाॕकीज फेम गायक नंदकुमार शेटे , आदी शेकडो मान्यवर उपस्थित होते.
कै. पंढरीनाथ शेटे यांचे आकस्मिकपणे निधनामुळे शेटे परिवारावर व शेटेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
उद्योजक , दुग्धव्यवसायिक , प्रगतीशील शेतकरी , दानशूर आणि मनमिळावू व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!