क्राईम न्युज

मंगळवेढा पोलीसांची दमदार कामगिरी

Spread the love

आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यास पोलिसांना यश- उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची पञकार परिषद मध्ये माहिती

मंगळवेढा पोलीस ठाणे हदिद्दत दोन दरोडे झाले होते. यातील पहिल्या घटनेमध्ये दामाजीनगर मधील सुवर्णा हजारे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडुन दरोडे खोरांनी प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पतीला लोखंडी गजाने मारहाण करून, हात फॅक्चर करून १.५ तोळे वजनाचे सोने लुटुन नेले होते. तसेच यातील दुस-या घटनेमधील चेतन्यनगर नागणेवाडी येथील मंदाकीनी सावजी यांच्या बंगल्याच्या दरवाजाची कडी तोडुन आत प्रवेश करून नव वधु दामपत्याला ठार मारण्याची भिती घालुन त्यांच्याकडुन एकुण ११ तोळे ३ ग्रॅम सोने लुटुल नेले होते.
मंगळवेढा शहरातील या पडलेल्या सलग दोन दरोडयामुळे मंगळवेढा शहरात भितीचे व असुरक्षतेची वातावरण निर्माण झालेले होते. दोन्ही दरोडे उघडकीस आणने पोलीसांपुढे आव्हाण निर्माण झाले होते. पोलीसांनी सदर प्रकरणात सखोल तपास करून तांत्रीक पुराव्याचा आधार घेवुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासुन फरारी असलेला निष्पन्न आरोपींना गोपनीय बातमीदारा मार्फत व तांत्रीक पुराव्याच्या आधारे ३१ जानेवारी २०२२ रोजी लोणावळा येथुन अटक करून त्याची अटकपूर्व वैदयकीय तपासणी करून त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट मंगळवेढा यांचे समक्ष हजर करून त्यांची ७ दिवसाची पोलीस कोठडी रिमांड घेवून त्यांच्याकडुन ५,००,०००/- रूपये किमतीचे १० तोळे सोने त्याने निवेदन पंचनाम्या प्रमाणे काढुन दिले आहे. यातील आरोपींनी यापूर्वी महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथे अशाप्रकारे गुन्हे केल्याचे माहिती मिळाली असून यातील आणखीन दोन निष्पन्न आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करून आणखीन गुन्हे उघडकीस आणण्याची पोलीस प्रशासन प्रत्नशील आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, राजश्री पाटीलउप विभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा विभाग, तसेच पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शलाखाली रणजीत माने पोलीस निरीक्षक, मंगळवेढा पोलीस ठाणे सपोनि / बापु पिंगळे, सपाफौ/अविनाश पाटील, पोना/दयानंद हेंबाडे, पोना/विठ्ठल विभुते, पोना/सचिन बनकर, पोकॉ/ सुरन देशमुख, पोकॉ/सोमनाथ माने, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मंगळवेढा कडील सपोफौ/ दत्तात्रय तोंडले, पोना/सुनिल मोरे, तसेच सायबर पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण कडील पोकॉ/अन्तर आत्तार व तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोफौ/ खाजा मुजावर, पोहेकॉ/नारायन गोलेकर यांनी कारवाई केली आहे. मंगळवेढा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वञ कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!