क्राईम न्युज

लॉटरी विक्रेते हे मटका किंग नव्हेत

Spread the love

एका बोगस पत्रकाराने ठाणे शहर.,ग्रामीण आणि मुंबईत लॉटरी विक्रेत्यांना दमबाजी करून खुलेआम खंडणी उकळत आहेत. त्यामुळे दहशतीचे वातावरण उभे ठाकले आहे. या पत्रकारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेनी केली आहे पोलिसांच्या आशिर्वादावरच ही वसुली सुरू आहे असे धमकविणाऱ्या पत्रकारानी ध्यानात ठेवावे की लॉटरी विक्रेते मटका किंग नव्हेत असे ही पत्रकात म्हटले आहे.
लॉटरी विक्रेत्यांच्या दुकानामध्ये घुसून दमबाजी करण्याचा एक कलमी कार्यक्रम हा बोगस पत्रकार करीत आहे. त्यामुळे छोटे- मोठे विक्रेते हे हैराण झाले आहेत. या संदर्भात दिवसेंदिवस घटना वाढत चालल्या असून या पत्रकारांचा नाव, तपशील हा पोलिस आयुक्तांकडे महाराष्ट्र राज्य लॉटरी सेनेने दिला आहे.
काही पत्रकार हे शंभर टक्के पत्रकार या श्रेणीत नाहीत तरीही ते आपण अधिकृत असल्याचे भासवत दिशाभूल करीत आहेत. त्यांचीही चौकशी पोलिसानी करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!