कृषीवार्ता

संगिता पाटील यांची शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा पदी निवड

Spread the love

कोकरुड/वार्ताहर
कोकरुड ता.शिराळा येथिल गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अध्यक्षा सौ संगिता अशोक पाटील यांची शरद जोशी मंच शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कांसाठी लढणाऱ्या या संघटनेची ध्येय,धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच संघटना बळकटीसाठी शरद जोशी मंच शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी नुकत्याच नवनियुक्त निवडी जाहीर केल्या आहेत. संगिता पाटील यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.याबाबतचे निवड पत्र त्यांना मिळाले आहे. तसेच याच संघटनेच्या सांगली जिल्हा ग्रामिण अध्यक्ष म्हणून आरिफ हवालदार यांचीही निवड करण्यात आली आहे.या निवडी बद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!