देश विदेश

योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सायकलवर ‘भारत भ्रमंती”

Spread the love

एक लाख कीलोमीटर सायकलवर प्रवास,मध्यप्रदेशच्या युवकाचा मानस
आपले शरीर हे निरोगी व तंदुरुस्त ठेवायचे असेल तर नियमित योगा करणे आवश्यक आहे.योगाचा
होणारा फायदा शालेय विदयार्थी व नागरीकांना समजावून सांगण्यासाठी, योगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी मध्यप्रदेश मधील मेहुल लखाणी या युवकाने चक्क सायकल वरुन भारतभर भ्रमंती करण्याचा संकल्प केला आहे. या दरम्यान एक लाख कीलो मीटर सायकल चालवण्याचा त्याचा मानस आहे.
२१ जुन आंतरराष्ट्रीय योगा दिनापासून होशांगाबाद बनखेडी(मध्यप्रदेश)येथुन मेहुल लखाणी सायकलने संपूर्ण देशात योगाचा प्रसार,प्रचार व्हावा यासाठी पाच राज्यातुन फीरत आज ११जानेवारीला शिर्डीला दाखल झाला.मध्यप्रदेश,छत्तिसगड,उत्तरप्रदेशगोवा आणि महाराष्ट्रातुन ते प्रवास करीत शिर्डीत दाखल झाले.शिर्डीतील साई नाईन स्पोर्टस,लायन्स क्लब,आदर्श माध्यमिक विदयालय,कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालय आदीच्या वतीने मेहुल लखानिचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मेहुल भारत यात्रीने आपले अनुभव सांगितले.आज त्यांनी सायकल यात्रेचा १०हजार कीलोमीटरचा टप्पा पुर्ण केला असुन येणाऱ्या तीन वर्षात ते १लाख कीलोमीटरचे लक्ष्य पुर्ण करणार असल्याचे मेहुल लखाणी यांनी सांगितले. श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी मेहुल लखानी यांच्या सायकल भ्रमण यात्रेचा हेतु सर्वाना स्पष्ट केला व त्यांची पुढील वाटचालीची माहीती सांगितली.
साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे विश्वस्त डाॕ.एकनाथ गोंदकर यांनी संस्थानच्या वतीने मेहुल लखानिचे स्वागत केले आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दील्या.लायन्स क्लबचे अध्यक्ष सागर कुलकर्णी यांनी लायन्स क्लबच्या वतीने मेहुलचा सत्कार केला.या प्रसंगी लायन्सचे खजिनदार वसंत घुगे,लायन्स क्लबचे सदस्य श्री.रघुनाथ गोंदकर,भाऊसाहेब लवांडे आदी उपस्थित होते.
साई नाईन स्पोर्टचे श्री.साईराज गायकवाड यांनी साईन स्पोर्टच्या वतीने लखानि यांचा सत्कार केला. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे विश्वस्त श्री.महेंद्र शेळके, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त श्री.सचिन तांबे,ग्रिन शिर्डी स्वच्छ शिर्डीचे अजित पारख आदीनी मेहुल लखानीच्या या उपक्रमाचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर मेहुल लखानी यांनी साईबाबाचे आर्शिवाद घेवुन पुढील वाटचाली साठी शनि शिंगणापुर कडे रवाना झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!