क्राईम न्युज

घरफोडी करणार चोरटा जेरबंद

Spread the love

गुन्हयाचे घटनास्थळाचा परीसरात असले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक माहितीवरुन निष्पन्न झाली.आरोपी जावेद बादशाह तांबोळी वय ४२ वर्षे रा. चिकुर्डे ता. वाळवा जि. सांगली सध्या रा. पाडळी ता. शिराळा जि. सांगली याचेकडून जप्त मुद्देमाल –

१) ८७,५००/- रु. किंमतीचे एक सोन्याचे साखळीतील काळे मणी मिक्स असलेले मंगळसूत्र अंदाजे साडेतीन तोळे वजनाचे जु.वा.कि.अं.

२) ३७,५००/- रु. किमतीचा एक सोन्याचा नेकलेस गोंड्यासह अंदाजे दीड तोळे वजनाचा जु.वा. कि.अं.

३) १२,५००/- रु. किंमतीचा एक जोड सोन्याचे कानातील टॉप्स अंदाजे अर्धा तोळा वजनाचे जु.वा.कि.अं.
४) १२.५००/- रु. किमतीची एक सोन्याची चेडणची अंगठी अंदाजे अर्धा तोळा बजणाची जु.वा.कि.अं.

५) २५,५००/- रु. किंमतीची एक सोन्याची वेडणची अंगठी अंदाजे एक तोळा चजणाची जु.वा.कि.अं.

६) १२,५००/- रु. किंमतीचे तीन जोड सोन्याचे कानातील टॉप्स अंदाजे अर्था तोळे वजनाचे जु.वा.कि.अं.

यातील अटक आरोपी याने जावेद बादशाह तांबोळी वय ४२ वर्षे रा. चिकुर्डे ता. वाळवा जि.सांगली सध्या रा. पाडळी ता. शिराळा जि. सांगली याने चिकुर्डे गावातील त्याचा भाऊ सलीम बादशाह तांबोळी याचे घराचा दरवाजा व कडी कोयंडा लोखंडी टॉमीने मोडुन घराचे आत प्रवेश करून घरातील बेडरुममध्ये असलेली लोखंडी कपाटाचे दरवाजे उचकटुन तसेच पत्र्याचे पेटीची कडी उचकटुन त्यात ठेवलेले वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागीने चोरुन घेवुन गेला होता. सदरबाबत यातील फिर्यादी निलोफोर सलीम तांबोळी यांनी दिले तक्रारीनुसार कुरळप पोलीस ठाणेस गु.र.नं. ४९ / २०२२ भा.द.स. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल केला आहे.
दिपक जाधव सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील , राजेंद्र जाधव पो.हे.कॉ., बाजीराव भोसले पो.हे.कॉ. ,रामजी पाटील पो.हे.कॉ. बापू कुंभार पो.हे. अनिल पाटील पो.ना. , अमोल माळी ,पो.ना.प्रमोद पाटील पो.कॉ.,फत्तेसिंग पाटील पो.कॉ., सचिन मोरे यांनी ही मोहीम फत्ते केली.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो, श्री दिक्षीत गेडाम सो, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मनिषा दुबुले मॅडम, पोलीस उप अधीक्षक कृष्णात पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपुर यांनी दिले सुचनेनुसार तसेच मा. दिपक जाधव सहा. पोलीस निरीक्षक मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राजेंद्र जाधव ब.नं. १५९२ यांनी केला आहे. सदर गुन्हायातील आरोपी याचा शोध घेत असताना तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करुन संशयीत आरोपी जावेद बादशाह तांबोळी वय ४२ वर्षे रा. चिकुर्डे ता. वाळवा जि. सांगली सध्या रा. पाडळी ता. शिराळा जि. सांगली याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन गुन्हायातील चोरीस गेला मुद्देमाल काढुन दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!