देश विदेश

तैवान भारत ग्रीन सप्लाय चेन मॅनेजमेंट सेमिनार संपन्न.

Spread the love

तैवान चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई आणि आयएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रीन सप्लाय चेन मॅनेजमेंट या विषयावर मुंबई स्थित आयएमसी मुख्यालयात सेमिनार संपन्न झाला. तैवान मधील उच्चस्तरीय व्यापारी मंडळ भारत देशाच्या भेटीवर असून यादरम्यान मुंबईमध्ये विविध उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येत आहेत. तैवान भारत या दोन देशात व्यापारी तथा आर्थिक गुंतवणूक अधिक प्रगत व्हावी तसेच पर्यावरण विषयक समस्यांना सामोरे जात प्रकल्प निर्मिती यावर सदर चर्चासत्रात विस्तृत मांडणी करण्यात आली. तैवान देशातील चेन यु ची, श्रीमती जेनिफर मकेचा तसेच आयएमसी संस्थेतील वरिष्ठ आर्थिक सल्लागार तथा पदाधिकारी, पर्यावरण एव आर्थिक विषयक ज्येष्ठ तज्ञ श्री सुधाकर मालपे, व्हिजन इज्युकेशन डेडिकेशन अध्यक्ष स्वप्निल राणी नंदकुमार याप्रसंगी विशेष उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!