आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा

दोन लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

लोणावळा : वेहेरगाव येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी शिशुपाल राठोड (रा. कंजारभाट वस्ती वेहेरगाव, ता. मावळ) याच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीणचे पोलिस एकवीरादेवी यात्रेच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास लोणावळा उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस हवालदार कुतुबुद्दीन खान, पोलीस हवालदार शकील शेख, महिला पोलिस कॉन्स्टेबल कोहिनकर, पोलीस उपनिरीक्षक बनकर यांना वेहेरगाव येथील कंजारभाट वस्ती जवळील ओढ्यालगत गावठी दारू बनवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन बनकर यांनी ताबडतोब दोन पंच आणि पोलीस स्टापला बोलवून घेत सापळा लावला. राठोड याला पोलिसांची चाहूल लागली असता त्यांने डोंगराच्या दिशेने पळ काढला व तो पसार झाला.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 प्लास्टिक ड्रम, त्यामध्ये 8 हजार लिटर कच्ची रसायन1 प्लास्टिक ड्रम,त्यात 1 हजार लिटरचे कच्चे रसायन असा अंदाजे 2 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. येथील जप्त करण्यात आलेली रसायने पोलिसांनी नष्ट केली आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!