क्राईम न्युज

वन्य प्राण्याच्या हल्यात 1 मेंढी व 4 पिल्ले ठार तर 4 बकरी जखमी..

Spread the love

कुंभोज मधील मेंढपाळ सतीश बंडगर यांच्या मेंढ्या मळ्यात बसायला असताना काल रात्री वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या 1 मेंढी व 4 पिल्ली ठार झाली तसेच काही बकरी जखमी झाल्या .ही घटना मेंढपाळांना सकाळी समजली . यामुळे सुमारे 50 हजाराचे नुकसान झाले . त्या मुळे मेंढपाळांना मोठा आर्थिक फटका बसला .ही घटना *ऑल इंडिया धनगर महासंघ चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा प्रा. शंकरराव पुजारी यांना श्री सागर घोदे यांनी फोन करून सांगताच , त्यांनी इचलकरंजी मधून कुंभोज मधील घटना स्थळी धाव घेतली. तेथील झालेले नुकसान पाहून सरांनी कोल्हापूर जिल्हा पशु वैद्यकीय अधीक्षक पठाण सर यांना फोन करून माहिती दिली. तसेच वन विभागाचे वन रक्षक भगवान भंडारी यांना ही घटना स्थळी ताबडतोब बोलवून घेतले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. चेंगबुरे यांनी मेंढ्यांचे व पिल्याचे पोस्टमार्टम केले .तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथील झालेल्या घटनेचा पंचनामा केला.यांचा सविस्तर अहवाल तयार केला .या घटना स्थळी कुंभोज चे सामाजिक कार्यकर्ता श्री सुरेश तानगे,श्री सागर घोदे, पत्रकार श्री सचिन भाणुसे , श्री पांडुरंग पुजारी हे ही उपस्थित होते. तसेच यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष राहुल माने व उपाध्यक्ष अमर पुजारी यांनी ही सहकार्य केले.
सततच्या होणाऱ्या वन्यप्राणी हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई ताबडतोब मिळावी अशी मागणी ऑल इंडिया धनगर महासंघ चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा प्रा. शंकरराव पुजारी यांनी केली. व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ही केली.

प्रा. शंकरराव पुजारी
ऑल इंडिया धनगर महासंघ
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष
99227 72522

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!