राजकीय

“शिवाजीराव नाईक यांचेमुळे जिल्ह्यातील भाजप होणार अस्वस्थ?”

Spread the love

शिराळा प्रतिनिधी-:
शिराळा तालुका हा तसा लढवयांचा तालुका. या तालुक्यात अनेक क्रांतिकारक घडले, अनेक संघर्ष घडले, अनेक चळवळीतून उभा राहिलेला हा शिराळा तालुका तसा स्वातंत्र्यापासून अग्रक्रमाकाणे ओळखला जातो.
पूर्वीपासूनच शिराळा तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक यांच्यामध्ये 1995 च्या निवडणुकीत तिकीट नाकरल्यामुळे दुफळी निर्माण झाली. शिवाजीराव नाईक नाराज होऊन काँग्रेसमधून बाहेर पडले. आणि स्वतःचे अस्तीत्व नाईक यांनी सिद्ध केले. अपक्ष म्हणून उभा राहिल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील इथनभूत माहिती असणारे शिवाजीराव नाईक यांनी शिराळा मतदारसंघ पिंजून काढला, आणि आमदार झाले. त्यावेळी शिवसेना-भाजपचे सरकार महाराष्ट्रात होते. तालुक्याचा विकास होईल आणि वाकुर्डे बुद्रुक योजना या योजनांना गती मिळेल. हा विकास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाले या मंत्रीपदाचा त्यांनी पुरेपूर मतदारसंघात विकास करण्यासाठी उपयोग करून घेतला.
ते १९९९ ला राष्ट्रवादी मधून आमदार झाले. पक्षाअंतर्गत राजकारणाला ते फार काळ त्या पक्षात टिकू शकले नाहीत. त्यानंतर ते तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी पक्ष सोडून पुन्हा अपक्ष उभा राहिले. 2004 ला ते पुन्हा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 ला भारतीय जनता पार्टी यांनी तालुक्याला भरगोस निधी देण्याचे व वाकुर्डे बुद्रुक योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्या पक्षात सर्व कार्यकर्त्यांना सांगून कार्यकर्त्यांचा कौल घेऊन प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी चे कमळ शिराळा तालुक्यात आमदार शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून फुलले. शिवसेना-भाजप युतीच्या या सरकारांमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अशा तालुक्याला जनतेला होती. परंतु भारतीय जनता पार्टीच्या वरीष्ठ नेत्यांनी आश्वासने पाळली नाहीत.त्यानंतर महाडिक गटाला पाठबळ दिले. आणि सत्यजित देशमुख यांना काँग्रेस मधून भाजप मध्ये आणले. नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस असे अनेक नेत्यांनी मंत्रीपदाचे गाजर शिराळा तालुक्याला दाखवलं परंतु मंत्रीपदापासून शिवाजीराव नाईक यांना वंचित ठेवलं. त्यातच शिवाजीराव नाईक याच्या अनेक संस्था अडचणीत असल्याने संस्था बंद पडल्या. बंद पडलेल्या संस्था पुन्हा पूर्ववत आणण्याकरिता काही विशेष तडजोडी भाजप कडून करणे गरजेचे असताना तसे वरिष्ठांकडून झालेले दिसत नाही. त्यामुळे शिराळा तालुक्याच्या विकासात भर घालणारी यशवंत ग्लुकोज कारखाना, शिवाजी केन यासारख्या सहकारी संस्था सुरू होऊन तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा व तालुक्याचा विकास व्हावा या उद्देशाने शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांचे मध्ये बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!