कृषीवार्ता

इंगरूळ येथे उभारलेला सौर निर्जलीकरण प्रकल्प कौतुकास्पद – बसवराज बिराजदार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / इंगरुळ (ता.शिराळा) ठिकाणी उभारलेला सौर निर्जलीकरण प्रकल्प निश्चितच कौतुकास्पद व तरुणांना दिशादर्शक आहे. असे प्रतिपादन बसवराज बिराजदार ( कोल्हापूर कृषी विभागाचे कृषी सहसंचालक) यांनी केले.
बसवराज यांनी इंगरुळ येथील सौर निर्जलीकरण केंद्रास भेट दिली. या वेळी ते बोलत होते.
त्यावेळी वरद ऍग्रोचे प्रणव हसबनीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सोबत जिल्हा मृद रसायन शासज्ञ बाळासाहेब लांडगे, शिराळा तालुका कृषी अधिकारी जी एस पाटील हे हजर होते
निवृत्त तालुका कृषी अधिकारी किशोर हसबनीस व प्रणव हसबनीस यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली
श्री बिराजदार यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पपाचे कौतुक करून कृषी खात्यातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यात्यानंतर शेड नेटला भेट देऊन निर्जलीकरणसाठी आवश्यक भाजीपाला लागवडीचे नियोजन बाबत प्रणव हसबनीस यांनी माहिती दिली.
सदर भाजीपाला निर्जलीकरण केल्यानंतर त्याचे उपयोग व त्या पासून तयार होणारे इतर उपपदार्थ व त्याचे मार्केटिंग इ विषयी संबधितांनी माहिती घेतली
बिराजदार यांनीही मार्केटिंग विषयी मार्गदर्शन केले
किशोर हसबनीस यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!